Posts

Showing posts from July, 2020

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या पुढे दिलेल्या यादीतील तिथीसाठी दिलेल्या महिन्याचे नाव महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अमावास्यान्त महिन्याच्या पद्धतीनुसार आहे. पौर्णिमान्त पद्धतीनुसार वद्य पक्ष पुढच्या महिन्यात येतो. उदा0 त्या पद्धतीनुसार, मराठी ज्येष्ठ वद्य त्रयोदशी ही आषाढ वद्य त्रयोदशी होते. गुरू अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?) अंगीरस ऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी) अग्रसेन जयंती ( आश्विन शुक्ल प्रतिपदा ) अण्णा भाऊ साठे जयंती ( १ ऑगस्ट ) अनसूया जयंती ( चैत्र वद्य चतुर्थी ) अन्‍नपूर्णा जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५ अर्जुन जयंती (फाल्गुन पौर्णिमा) सम्राट अशोक जयंती - अहिल्यादेवी होळकर जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी आझाद हिंद सेना स्थापना दिवस (२१ ऑक्टोबर १९४३) आदि शंकराचार्य जयंती ( वैशाख शुद्ध पंचमी ) बाबासाहेब आंबेडकर जयंती ( एप्रिल १४ ) औद्योगिक सुरक्षा दिवस ( नोव्हेंबर २ ) क-ग कबीर जयंती ( ज्येष्ठ पौर्णिमा ) (वट पौर्णिमा) कर्ण जयंती (माघ शुक्ल प्रतिपदा) मॉं कर्मादेवी...

गांधी जयंती

गांधी जयंती गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.  मोहनदास करमचंद गांधी              ( ऑक्टोबर २ ,  इ.स. १८६९  -  जानेवारी ३० ,  इ.स. १९४८ ) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.  महात्मा गांधी  या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.  रवींद्रनाथ टागोर  यांनी सर्वप्रथम त्यांना ‘ महात्मा ’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने  बापू  म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे  राष्ट्रपिता  म्हटले जाते.  सुभाषचंद्र बोस  यांनी  इ.स. १९४४  मध्ये पहिल्य...

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. [१] याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. [२] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर , इ.स. १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. [३] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. [४] भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. [५] इतिहास भारतालाया ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. [६] यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्य...

स्वातंत्र्य दिन (भारत)

स्वातंत्र्य दिन (भारत)           स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. [१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. [२] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. [३] [४] भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायद...

गणेश चतुर्थी

गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा” हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात. गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.                 श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. [१] [२] गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. [३] गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. [३] गणेश चतुर्थी व्रत...

राखी पौर्णिमा

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! धार्मिक महत्व  विधीचा प्रयोग असा- सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे. - येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ॥ (अर्थ- महाबली दानवेद्र बळी राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस.) यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते. [३] या श्रावण पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात          रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भा...