विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या
विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या पुढे दिलेल्या यादीतील तिथीसाठी दिलेल्या महिन्याचे नाव महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अमावास्यान्त महिन्याच्या पद्धतीनुसार आहे. पौर्णिमान्त पद्धतीनुसार वद्य पक्ष पुढच्या महिन्यात येतो. उदा0 त्या पद्धतीनुसार, मराठी ज्येष्ठ वद्य त्रयोदशी ही आषाढ वद्य त्रयोदशी होते. गुरू अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?) अंगीरस ऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी) अग्रसेन जयंती ( आश्विन शुक्ल प्रतिपदा ) अण्णा भाऊ साठे जयंती ( १ ऑगस्ट ) अनसूया जयंती ( चैत्र वद्य चतुर्थी ) अन्नपूर्णा जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५ अर्जुन जयंती (फाल्गुन पौर्णिमा) सम्राट अशोक जयंती - अहिल्यादेवी होळकर जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी आझाद हिंद सेना स्थापना दिवस (२१ ऑक्टोबर १९४३) आदि शंकराचार्य जयंती ( वैशाख शुद्ध पंचमी ) बाबासाहेब आंबेडकर जयंती ( एप्रिल १४ ) औद्योगिक सुरक्षा दिवस ( नोव्हेंबर २ ) क-ग कबीर जयंती ( ज्येष्ठ पौर्णिमा ) (वट पौर्णिमा) कर्ण जयंती (माघ शुक्ल प्रतिपदा) मॉं कर्मादेवी...