शाहू महाराज

             छत्रपती शाहू महाराज 
      शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[१] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.[

 कार्य 

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.[३]

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
अधिकारकाळ                  इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण             एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती                         कोल्हापूर जिल्हा
राजधानी                            कोल्हापूर
पूर्ण नाव                    छत्रपती शाहू महाराज भोसले
जन्म  जून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर
मृत्यू     मे ६, इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारी    छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
राजाराम ३
उत्तराधिकारी           छत्रपती राजाराम भोसले
वडील                     आबासाहेब घाटगे
आई                       राधाबाई
पत्नी                      महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे               भोसले
राजब्रीदवाक्य           जय भवानी

शैक्षणिक कार्य 

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा [४]

शैक्षणिक वसतिगृह 

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)


Comments

Popular posts from this blog

गांधी जयंती

राखी पौर्णिमा

गणेश चतुर्थी